डाव्या कट्टरतावादाच्या विरोधात सरकारनं कठोर धोरण अवलंबलं असून पुढच्या मार्चपर्यंत त्याचं समूळ उच्चाटन करायचं ध्येय ठेवलं आहे. असा पुनरुच्चार सरकारनं आज केला. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार, राज्यांसोबत काम करत आहे, असं प्रतिपादन गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात केलं.
यासाठी राज्यांना सीएपीएफच्या तुकड्या पुरवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तसंच, पुरेशा प्रशिक्षण सोयीसुविधा आणि ७०६ पोलीस स्थानकांच्या उभारणीला मान्यता दिल्याचंही राय यांनी सांगितलं.लोकसभेत आज निवडणूक सुधारणांच्या मुद्यावर चर्चा होणार आहे. तर राज्यसभेत वंदे मातरम् च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त चर्चा सुरु आहे.