डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या अंतिम सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेशी लढत

टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, उद्या गायना मध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेशी अंतिम सामना होणार आहे. काल भारताच्या फिरकी गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या आणि कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला माघारी पाठवत भारतीय संघानं तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

 

पावसामुळं नाणेफेकीला उशीर झाल्यानंतर इंग्लंडनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पहिले दोन गडी झटपट गमावल्यानंतर, पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र रोहित शर्माच्या ५७ आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या जोरावर भारतीय संघाने१७१ धावांपर्यंत मजल मारली. गोलंदाजांनी उर्वरीत कामगिरी पार पाडत इंग्लंडला सोळा षटक ४ चेंडूत १०३ धावातच गारद केलं.