June 25, 2024 2:47 PM

printer

झारखंडमध्ये ७ माओवादी ताब्यात

झारखंडमधल्या लातेहार जिल्ह्यातल्या इचाबार इथून, बंदी असलेल्या कम्युनिस्ट पक्षापासून फारकत घेतलेल्या, तृतीय सम्मेलन प्रस्तुती समिती या प्रतिबंधीत गटाच्या सात सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या माओवाद्यांकडून दोन बंदुका आणि काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती स्थानिक पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.