झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील दाट सारंडा जंगलात माओवादी बंडखोरांशी झालेल्या भीषण चकमकीनंतर सुरक्षा दलांना नक्षलविरोधी मोहिमेतलं मोठं यश मिळालं आहे. झारखंड पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलांच्या संयुक्त पथकाची काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत जराईकेला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुलापू बुरू परिसरात माओवाद्यांशी चकमक सुरू होती.
दीर्घकाळ सुरू असलेल्या गोळीबारानंतर, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आजूबाजूच्या जंगल परिसरात व्यापक शोध मोहीम सुरू केली. यामध्ये शस्त्रास्त्रे, दारूगोळा, स्फोटके आणि माओवादी साहित्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. बंडखोर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचं दिसून आलं.