डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जोगेश्वरी इथल्या कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी खासदार रविंद्र वायकर यांच्याविरोधातला तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे शाखेचा अहवाल

मुंबईत जोगेश्वरी इथल्या कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्याविरोधातला तपास बंद करण्याचा अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दिला आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी वायकर यांच्यासह त्यांची पत्नी आणि त्यांच्या चार भागिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्यावतीनं यासंदर्भात दाखल करण्यात आलेली तक्रार, अपुरी माहिती आणि गैरसमाजावर आधारित होती, असं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलं आहे.
याप्रकरणी दिलेलं पत्र मागे घेण्याचं निवेदन मुंबई महापालिकेनं यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात दिलं होतं. त्यामुळं याप्रकरणी आधीच क्लिन चिट मिळाली असून मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात नवीन काही नसल्याचा दावा वायकर यांनी केला आहे. सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे. वायकरांना क्लिन चीट देणं म्हणजे भाजप भ्रष्ट नेत्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप केला आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.