August 29, 2025 3:30 PM | jaalna accident

printer

जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यामध्ये गाडी विहिरीत कोसळून५ जण ठार

 जालना जिल्ह्यामध्ये जाफराबाद तालुक्यात भरधाव वेगाने जाणारी गाडी रस्त्यालगतच्या विहीरीत पडल्याने झालेल्या अपघातात पाच जण ठार, तर २ जण जखमी झाले. जाफराबादमध्ये राजुर-टेंभुर्णी मार्गावरच्या गाडेगव्हाण फाटा इथं हा अपघात झाला.

 

ही गाडी मेहकर तालुक्याच्या दिशेने जात असताना रस्त्यावर सकाळी फेरफटका मारणाऱ्या दोन स्थानिकांना वाचवण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.