जर्मनीचे चॅन्सेलर फ्रीड्रीच मर्झ उद्यापासून २ दिवसांच्या भारत भेटीवर येत असून, हा त्यांचा पहिलाच अधिकृत भारत दाैरा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अहमदाबाद इथे त्यांचं स्वागत करतील.
उभय नेत्यांमध्ये संरक्षण-व्यापार-तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास या क्षेत्रांतील धोरणात्मक भागीदारीवर चर्चा होईल. मर्झ, साबरमती आश्रम आणि बंगळुरू इथल्या बाॅश या संकुलालाही भेट देणार असून, हा दाैरा द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा देणारा ठरेल, असं परराष्ट्र विभागानं म्हटलं आहे.
Site Admin | January 11, 2026 7:56 PM | jarman chanceler
जर्मनीचे चॅन्सेलर फ्रीड्रीच मर्झ उद्यापासून २ दिवसांच्या भारत भेटीवर