डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेशात तयारी सुरु

जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेशात तयारी सुरु आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूंछ इथून सुरणकोट, मेंढार आणि हवेली विधानसभा मतदारसंघातल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे पोहोचवण्यात आली आहेत. यावेळी निवडणूक अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या विधानसभा मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात २५ सप्टेंबरला मतदान होणार असून ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.