December 10, 2025 8:28 PM | Silver Price

printer

चांदीच्या दराचा नवा विक्रम

देशात चांदीच्या दरांनी आज नवी उच्चांकी पातळी गाठली. कालच्या तुलनेत साडे ६ हजार रुपयांनी चांदी महाग झाली आणि मुंबईच्या बाजारपेठेत एक किलो चांदीसाठी १ लाख ९१ हजार रुपये मोजावे लागत होते. काल १ किलो चांदी १ लाख ८४ हजार रुपये दराने मिळत होती. 

सोन्याच्या दरात मात्र फारशी वाढ झाली नाही. एक तोळा २२ कॅरेट सोन्यासाठी १ लाख ३१ हजार रुपये मोजावे लागत होते.