ग्रीसमध्ये वनक्षेत्रात लागत असलेल्या वणव्यांमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. वणव्यांंमुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. तर घरं, शेती आणि औद्योगिक सुविधांचं नुकसान होत आहे.
ग्रीस मधे गेल्या २४ तासांत ८२ वणवे लागले असून त्यापैकी २३ वणवे अद्याप सक्रिय आहेत. जोरदार वाऱ्यांमुळे आग आणखी पसरत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ग्रीसला तीव्र उष्णता आणि दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.