गेल्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली.
येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंदिगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये येत्या ३१ तारखेपर्यंत दाट ते अतिदाट धुकं राहील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तराखंड, पश्चिम मध्य प्रदेश, ओदिशा, पश्चिम बंगालचा हिमालयाजवळचा भाग आणि इशान्य भारतात उद्या दाट धुकं राहण्याची शक्यता आहे. छत्तीसगड, हरयाणा, चंदिगड, दिल्ली, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये उद्यापर्यंत थंडीची लाट राहील. तर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही उद्या थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे.