मोदी सरकारच्या धोरणामुळे गेल्या ११ वर्षात सामाजिक न्यायाची मूळ भावना प्रत्यक्षात साकार होत असल्याचं दिसत आहे , असं कायदे आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते.
मुद्रा योजनेमुळे देशातल्या नागरिकांची आर्थिक क्षमता वाढली असून सुमारे २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत, असं त्यांनी सांगितलं. सरकार कच्च्या घरांचं रूपांतर पक्क्या घरात करत असून प्रत्येक घरात वीज जोडणी आणि शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.