September 4, 2024 2:02 PM

printer

गुजरात, सौराष्ट्र,कच्छ, कोकण,गोवा, विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा

गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ, कोकण आणि गोवा, विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. उत्तर तामिळनाडू, रायलसीमा भागालगतचा कर्नाटकमधला काही प्रदेश, राजस्थान, दक्षिण मराठवाडा आणि तेलंगणा, हरयाणाचा दक्षिण भाग तसंच, पश्चिम आणि ईशान्य उत्तर प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तराखंड, पश्चिम बिहार, पूर्व झारखंड, गंगेच्या खोऱ्यानजीकचा पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये रात्रीच्या वेळी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिल्ली शहरात ९ सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.