डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

के आर्मस्ट्राँग यांच्या हत्येप्रकरणी अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे आदेश

बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष के आर्मस्ट्राँग यांच्या हत्येप्रकरणी चौकशी करून पोलीस अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी दिले आहेत. या घटनेमुळे आपल्याला तीव्र धक्का बसला असून शोकमग्न कुटुंबियांबद्दल त्यांनी सहवेदना व्यक्त करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काल झालेल्या या हत्येनंतर पोलिसांनी तपास करून काही तासातच आठ जणांना अटक केल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास जलदगतीनं करावा असे आदेश स्टॅलिन यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. के आर्मस्ट्राँग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईच्या राजीव गांधी सामान्य रुग्णालयात ठेवलं आहे. 

दरम्यान, द्रमुक सरकार राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी केली आहे.