केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. छत्रपती संभाजी नगर शहरातील सिडको परिसरातील कॅनॉट उद्यानात उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात येईल. तसंच आपल्या दौऱ्यात ते उद्योजकांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर संरक्षणमंत्री लखनौला रवाना होणार आहेत.