January 18, 2026 12:33 PM | wingsindia

printer

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते येत्या २८ तारखेला होणार विंग्ज इंडिया २०२६चे उद्घाटन

आशियातील सर्वांत मोठ्या नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्ज इंडिया २०२६चे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते येत्या २८ तारखेला  होणार आहे. भारतीय विमान वाहतूक:  आरेखन ते विमान तैनात करणे, उत्पादन ते देखभाल, सर्वसमावेशकता ते नाविन्यता आणि सुरक्षा ते शाश्वतता याद्वारे भविष्यातील मार्ग प्रशस्त करणे हे या चार दिवसांच्या जागतिक कार्यक्रमाचे विषयसूत्र आहे. भारताचे वेगाने विस्तारणारे विमान वाहतूक क्षेत्र, वाढत्या जागतिक प्रभावावर आणि उत्पादन सेवा, नावीन्य आणि शाश्वत विमान वाहतूक उपायांसाठीचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येणाऱ्या भारताचा दृष्टीकोन अधोरेखित करणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, विमानांचे स्थिर प्रदर्शन, उड्डाण आणि हवाई कसरली तसेच उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद, उड्डाण क्षेत्रातील रोजगार मेळा आदींचे आयोजन केले जाणार आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.