कुवैतमधून ४५ भारतीय नागरिकांचे मृतदेह भारतात पोहोचले

कुवैतमध्ये अग्निकांडात मरण पावलेल्या ४५ भारतीय नागरिकांचे मृतदेह काल भारतात पोहोचले. या दुर्घटनेतल्या मृतांमध्ये केरळमधील २३, तामिळनाडू ७, आंध्रप्रदेश ३, उत्तर प्रदेश ३, ओडिशा २ आणि बिहार, पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, झारखंड, हरियाणा तसंच महाराष्ट्रातून प्रत्येकी एक अशा एकूण ४५ जणांचा समावेश आहे. मुंबईत मालाड इथले ३३ वर्षीय डेनी करुणाकरन यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.