कारगिलमध्ये युनिफॉर्म फोर्स मुख्यालयानं आयोजित केलेल्या ‘महिला मोटरसायकल फेरी’ सह विविध कार्यक्रमांचं आयोजन

कारगिल विजय दिवसाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त, कारगिलमध्ये उद्या 26 जुलै रोजी युनिफॉर्म फोर्स मुख्यालयानं आयोजित केलेल्या ‘महिला मोटरसायकल फेरी’ सह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या फेरीमध्ये भारतीय सैनिकांच्या अदम्य भावनेला आणि नारी शक्तीला मानवंदना देण्यासाठी 25 निष्णात महिला मोटरसायकल चालक सहभागी होणार आहेत. यामध्ये देशभरातील लष्करी कर्मचाऱ्यांच्या पत्नी, लष्करी सेवेतील महिला अधिकारी आणि अन्य पदाधिकारी महिला सहभागी होतील.