डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 31, 2024 2:54 PM | BJP | Ravi raja

printer

काँग्रेस नेते रवी राजा यांंचा भाजपात प्रवेश

महायुतीचे तिन्ही पक्षांकडून बंडखोरांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अर्ज परत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते रवी राजा यांंनी आज भाजपात प्रवेश केला, तेव्हा फडणवीस बोलत होते. रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला होईल. रवी राजा यांच्या माध्यमातून काँग्रेसचे अनेकजण भाजपमध्ये येतील, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. रवी राजा शीव कोळीवाडा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र त्यांना डावलण्यात आल्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर भाजपाचे मुंबई उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.