डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 2, 2024 1:34 PM | Vidhan Bhavan

printer

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान भवनात

लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज महाराष्ट्राच्या विधान भवनात उमटले. भाजप गटनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार यांच्यासह इतरांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. काल विधानपरिषदेत झालेल्या गदारोळावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली. प्रत्युत्तरादाखल विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही राज्यघटनेच्या प्रस्ताविकेच्या प्रती हातात घेऊन घोषणाबाजी केली.