करुणा, सहिष्णुता, परस्पर आदर आणि सामूहिक जबाबदारी ही मूल्य भूतकाळातील नसून, बळकट आणि सुसंवादी आधुनिक जगासाठी आवश्यक असलेला पाया आहेत. असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. तेलंगणातील हैदराबाद इथं गाचीबोवली इथं झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विकसित भारताच्या दृष्टीकोनासाठी आधुनिक शिक्षण आणि नैतिक शहाणीव तसंच नवोपक्रम आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा संगम असणे आवश्यक असल्याचं त्या म्हणाल्या. देशाचे भवितव्य केवळ तरुणांच्या कौशल्यांनी आणि ज्ञानाने नव्हे तर सचोटी आणि उद्देशाप्रती भावना यांनी घडणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
Site Admin | December 21, 2025 10:03 AM | Draupadi Murmu
करुणा, सुसंवाद, परस्पर आदर ही मूल्ये बळकट, सुसंवादी आधुनिक जगाचा पाया असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन