May 8, 2025 10:51 AM

printer

एस जयशंकर यांची ऑपरेशन सिंदूर अंतर्गत विविध देशांतील समपदस्थाबरोबर कारवाईबाबत चर्चा

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल स्पेन, जर्मनी, फ्रान्स, कतार आणि जपान या देशांच्या त्यांच्या समपदस्थाबरोबर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईबाबत चर्चा केली. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ ठिकाणी दहशतवाद्यांना आणि दहशतवादी पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केलेल्या हल्ल्यांनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीही अनेक देशांच्या समपदस्थांसोबत चर्चा केली.