डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 23, 2025 3:29 PM | ST Bus

printer

एसटी महामंडळ तोट्यात

एसटी महामंडळ गेल्या ४५ पैकी ३८ वर्ष तोट्यात होते. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अखेर महामंडळाला १० हजार कोटींपेक्षा अधिक तोटा झाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळाची श्वेत पत्रिका आज प्रसिद्ध झाली. या तोट्यामागे बसची कमतरता, अनियमित भाडेवाढ, अवैध वाहतूक यासारखी कारणे श्वेतपत्रिकेत नमूद आहेत. दरवर्षी ५ हजार बसची खरेदी, इलेक्ट्रिक तसेच सीएनजी- एलएनजी आधारित बसचा समावेश, महामंडळाच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास, अपघातांचे प्रमाण कमी करणे यासारख्या पर्यायांचा समावेश श्वेतपत्रिकेत आहे.