November 20, 2025 11:30 AM

printer

एकोणीस वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं एकोणीस वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. झिम्बाब्वे आणि नामिबिया यांनी संयुक्तरित्या याचे आयोजन केलं आहे.

 

चार गटांमध्ये 16 संघ या स्पर्धेत सहभागी असून एकूण 41 सामने होणार आहेत. सहा फेब्रुवारी रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब इथं अंतिम सामना होईल. या स्पर्धेत सलामीचा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात होणार असून, झिम्बाब्वेचा सामना स्कॉटलंडशी आणि टांझानियाचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होईल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.