डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाचा देशभरात उत्साह

राजधानी दिल्लीतल्या मुख्य कार्यक्रमासह देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा होत आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, डॉ. एस. जयशंकर, नितीन गडकरी, डॉ. जितेंद्र सिंह, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी शासकीय निवासस्थानी तिरंगा फडकावला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी छत्रसाल स्टेडियम इथं ध्वजवंदन केलं. 

गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी, तर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रध्वज फडकावला. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळुरू इथं, तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विजयवाडा इथं तिरंगा फडकावला.

ओडिशाची राजधानी भुवनेश्वर इथल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री मोहन चरण माझी, तर छत्तीसगडमध्ये रायपूरच्या पोलीस परेड मैदानावर मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा इथं, आणि आसामची राजधानी गुवाहाटी इथं मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांनी तिरंगा फडकावला.

पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान, मध्य प्रदेशात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी राष्ट्रध्वज फडकावला.

केरळमध्ये मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी, तर उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तिरंगा ध्वज फडकावला.

नागालँडचे मुख्यमंत्री नेइफिऊ रिओ, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमंग यांच्या हस्ते त्या त्या राज्यांमधल्या मुख्य शासकीय कार्यक्रमांमध्ये ध्वजवंदन झालं.

सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात ध्वजवंदन केलं.

दिल्लीतल्या दोन्ही महाराष्ट्र सदनांमध्ये निवासी आयुक्त आणि सचिव आर. विमला यांनी राष्ट्रध्वज फडकावला.

देशोदेशीच्या उच्चायुक्तालयांमध्येही भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या साजरा होत आहे.

बांगलादेशमधल्या भारतीय उच्चायुक्तालयात उच्चायुक्त प्रणय वर्मा यांच्या हस्ते इथं ध्वजवंदन झालं. 

श्रीलंकेतले भारताचे उच्चायुक्त संतोष झा यांनी कोलंबो इथं भारतीय शांतिसेना स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा