उत्तर प्रदेशात बस आणि पिकअप यांची धडक होऊन १० कामगारांचा मृत्यू, ३७ जण जखमी

उत्तर प्रदेशात, बुलंदशहर जिल्ह्यातल्या सालेमपूर भागात एक बस आणि पिकअप यांची धडक होऊन १० जणांचा मृत्यू झाला तर ३७ जण जखमी झाले. अपघातग्रस्त पिकअपमधले कामगार गाझियाबादहून रक्षाबंधनाच्या सणासाठी अलीगड जिल्ह्यातल्या रायपूर या गावी निघाले होते. 

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे, तर चार गंभीर जखमींना मेरठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेची दखल घेत जखमींना तात्काळ योग्य ते उपचार पुरवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.