November 9, 2025 8:11 PM | Uttarakhand

printer

उत्तराखंड राज्याचा आज २५वा स्थापना दिवस

उत्तराखंड राज्याचा आज २५वा स्थापना दिवस आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहरादून इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांनी विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन, उत्तराखंडमधल्या आठ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमीपूजन आणि उद्घाटन केलं. तसंच प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून २८ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६२ हजार कोटी रुपये हस्तांतरित केले. गेल्या २५ वर्षांत उत्तराखंडचं चित्र पूर्णपणे पालटलं असून पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास यात भरीव कामगिरी केली आहे. राज्यात दोन लाख कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांवर काम सुरू आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.