इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांचा प्रधानमंत्री मोदी यांच्याशी संवाद

इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि पश्चिम आशियातल्या सद्य स्थितीबाबत चर्चा केली. सध्याचा तणाव कमी करणं गरजेचं आहे, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. सर्व बंदीवानांची तात्काळ सुटका करण्याचं आवाहन त्यांनी केलं. संवाद आणि राजनितीक मार्गानं संघर्षावर लवकर आणि शांततापूर्व तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

 

भारत-इस्राएल धोरणात्मक भागिदारी अधिक मजबूत करण्यासाठी तसंच उभयपक्षी सहकार्याच्या विविध बाजूंवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.