January 13, 2026 1:39 PM

printer

इराणशी व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांच्या अमेरिकेबरोबरच्या व्यापारावर अतिरिक्त कर लादायची ट्रम्प यांची घोषणा

इराणशी व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांच्या अमेरिकेबरोबरच्या व्यापारावर अतिरिक्त २५ टक्के कर लादायची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा अतिरिक्त कर तत्काळ लागू होईल, असं ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. इराणमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर सरकार करत असलेल्या हिंसक कारवाईच्या पार्श्वभूमीवर इराणवर दबाव निर्माण करायचा अमेरिकेचा उद्देश आहे. इराणवर लष्करी कारवाई करायच्या दृष्टीनं लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं, तसंच इतरही पर्यायांची माहिती आपण घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. इराण युद्धाला तयार आहे, पण परस्पर आदर राखून चर्चा करायची आपली भूमिका आहे, अशी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. इराणमध्ये संपर्कव्यवस्था अजूनही बंद आहे. या संघर्षात आत्तापर्यंत किमान ६४८ आंदोलक ठार झाल्याची माहिती मानवाधिकार गटांनी दिली आहे.