January 2, 2026 3:09 PM

printer

इंदूरमधे दूषित पाण्यामुळे अतिसार होऊन १० जणांचा मृत्यू

इंदूरमधल्या भगीरथपुरा इथं दूषित पाण्यामुळे अतिसार होऊन १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे, असं इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी आज सांगितलं. या भागातल्या पेयजलाचे नमुने अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

  नळाला लागलेल्या गळतीमुळे पेयजल दूषित झाल्याचा अहवाल एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेनं दिल्याचं काल मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी काल सांगितलं होतं. गेले नऊ दिवस या भागातले सुमारे चौदाशे नागरिक उलट्या आणि जुलाब यांनी त्रस्त असल्याचं आढळून आलं आहे . 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.