आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर इथे विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी एसटीनं ५ हजार २०० बसची व्यवस्था केली आहे. या बस घेऊन येणारे चालक, वाहक, इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या चहा, नाश्ता आणि जेवणाची मोफत व्यवस्था केली जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
आषाढी वारीच्या काळात म्हणजे ५, ६ आणि ७ जुलै यादिवशी चंद्रभागा बसस्थानक, भीमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक आणि पांडुरंग बसस्थानक इथं सुमारे १३ हजार एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ मिळेल.