आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सुपर फोरमध्ये आज भारताचा सामना चीनविरुद्ध होणार आहे. आत्तापर्यंत भारतानं एका सामन्यात विजय मिळवला आहे, तर दुसरा सामना अनिर्णित राहिला आहे. सुपर फोरच्या पदकतालिकेत भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजेय राहिल्यानं आशिया करंडकासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात कोरियासमोर मलेशियाचं आव्हान असणार आहे.
Site Admin | September 6, 2025 3:11 PM | Asian Hockey Champions Trophy
आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सुपर फोरमध्ये भारताचा सामना चीनविरुद्ध होणार
