डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 8, 2025 1:55 PM | India | World Bank

printer

आर्थिक वाढीच्या दराबाबत जागतिक बँकेनं भारताचं केलं कौतुक

आर्थिक वाढीच्या दराबाबत जागतिक बँकेनं भारताचं कौतुक केलं आहे. जागतिक दर्जाची डिजीटल सेवा हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया असल्याचं जागतिक बँकेने म्हटलं आहे. तंत्रज्ञानातली क्षमता आणि उत्पादकतेत सुधारणा झाल्याचंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे. यापुढेही आर्थिक विकास अधिक वेगानं होण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन आणखी मजबूत करायला हवं. आर्थिक क्षेत्रांमधे सुधारणा आणि खाजगी गुंतवणुकीवर भर द्यावा लागेल, असं निरीक्षणही जागतिक बँकेने नोंदविलं आहे.