आज दुसरा जागतिक ध्यान दिवस

जागतिक पातळीवर आज दुसरा ध्यान दिवस पाळण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने गेल्या वर्षी 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस घोषित केला. 21 डिसेंबरपासून उत्तरायणाला प्रारंभ होत असल्याने ही तारीख निवडण्यात आली होती. न्यूयॉर्कमध्ये आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात जागतिक शांतत आणि सलोख्यासाठी ध्यान सत्राचे नेतृत्व केले. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या ध्यानयोगाच्या शिकवणीची आठवण करून देत, सध्याची स्थिती युद्धभूमीपेक्षा वेगळी नसल्याचे सांगून युक्रेनमध्ये लढाईत सामील असलेल्या 8 हजार सैनिकांना निराशेतून बाहेर काढण्यासाठी ध्यानधारणेतून शांतता लाभली असे ते म्हणाले.