दिल्लीत आजपासून राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राला प्रारंभ होणार आहे. आयुष मंत्रालयाअंतर्गत असणारी ही स्वायत्त संस्था आहे. आयुर्वेदाद्वारे बालआरोगशास्त्रात आजार आणि कल्याण व्यवस्थापन असा या वर्षीचा विषय आहे.
दोन दिवसांच्या या चर्चासत्रामध्ये अनेक विद्वान, संशोधक, अभ्यासक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पारंपरीक आयुर्वेदीय दृष्टीकोन आणि बालआरोग्य, बालकल्याण यांना प्रोत्साहन देण्यासाठी समकालीन सिद्ध झालेल्या पद्धतींवर आधारित चर्चा होईल. तसेच, वैज्ञानिक संशोधन सादरीकरणही होणार आहे.