मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची विमानसेवा उद्या सहा तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत धावपट्टीच्या देखभालीची आणि दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत.
या कामांच्या पार्श्वभूमीवर काही विमान कंपन्यांनी नियोजित उड्डाणे रद्द केली असून काहींनी मुंबईऐवजी पर्यायी विमानतळांवर विमानं उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.