डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 9, 2025 7:40 PM | Nitin Gadkari

printer

अहिल्यानगर जिल्ह्यात १३८० कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं भूमिपूजन

सूरत ते चेन्नई या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महामार्गामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी आज दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात १ हजार ३८० कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते.

 

सूरत ते चेन्नई या सोळाशे किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा काही भाग महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांतून जाणार आहे. या रस्त्यालगतची जमीन संपादित करून तिथे औद्योगिक विकास केला जाऊ शकतो, असंही ते यावेळी म्हणाले. अहिल्यानगर-शिर्डी रस्त्याचं काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.  

 

यानंतर गडकरी यांच्या हस्ते डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्‍दबद्ध केलेल्‍या ‘देह वेचावा कारणी’ या आत्‍मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.