डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अहमदनगर जिल्‍ह्याचा नामांतराचा मार्ग सुकर

अहमदनगर जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव द्यायला रेल्‍वे मंत्रालयानं हिरवा कंदिल दिल्यानं जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्‍याचं जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितलं.

 

जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे नाव देण्‍याची मागणी झाल्‍यानंतर महायुती सरकारनं अहिल्‍यानगर असं नाव देण्‍याचा निर्णय घेतला. मात्र नामांतराच्‍या बाबतीत सर्व प्रक्रीया केंद्र सरकारच्‍या अखत्‍यारीत पूर्ण होत असल्‍यानं प्रत्‍येक विभागाची ना हरकत आवश्‍यक असते. आता रेल्वे मंत्रालयानं, नामांतराच्‍या बाबतीत हरकत नसल्‍याचं पत्र जारी केलं आहे. या नावाचं कोणतंही रेल्‍वेस्‍थानक देशात नसल्‍याचं या पत्रात नमुद केलं आहे, असं मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं.