अयोध्येत ५५ घाटांवर २५ लाख १२ हजारपेक्षा जास्त पणत्या उजळून सातवा गिनेस विश्वविक्रम

उत्तर प्रदेश सरकारनं काल उत्तर प्रदेशात अयोध्येतल्या ५५ घाटांवर २५ लाख १२ हजारपेक्षा जास्त पणत्या लावून सातवा गिनेस विश्वविक्रम नोंदवला. रामजन्मभूमी मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतरचा हा पहिलाच दीपोत्सव होता. काल शरयूच्या घाटांवर एकाच वेळी १ हजार १२१ बटूंनी आरतीही करून आणखी एक विक्रम केला. अयोध्येतला हा दीपोत्सव फक्त अयोध्या किंवा उत्तर प्रदेशासाठी नव्हे तर संपूर्ण देश आणि जगासाठी उल्लेखनीय आयोजन असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.