December 31, 2025 3:13 PM

printer

अयोध्येत श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी

अयोध्येत श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित धार्मिक अनुष्ठानात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सहभागी झाले तसंच त्यांच्या हस्ते राममंदिर संकुलातल्या अन्नपूर्णा देवीच्या मंदिरावर धर्मध्वजा फडकवण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. तत्पूर्वी उभयतांनी हनुमानगढी मंदिरातही दर्शन घेतलं. या प्राणप्रतिष्ठा द्वादशी कार्यक्रमाचं यजमानपद राजनाथ सिंग यांनी भूषवलं. हा कार्यक्रम परवापर्यंत चालणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.