June 26, 2024 2:44 PM | Badminton | US

printer

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडीनं आयरीश जोडीचा केला पराभव

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात कृष्ण प्रसाद गरगा आणि साई प्रतीक के या भारतीय जोडीनं स्कॉट गिल्डिया आणि पॉल रेनॉल्डस या आयरीश जोडीचा पराभव केला.राऊंड ३२ च्या या सामन्यात भारतीय जोडीनं २१-१४, २१-१२ अशा सरळ गेममधे प्रतिस्पर्धी जोडीला नमवलं.

 

भारताच्या कार्तिकेय गुलशन कुमारचं आव्हान मात्र काल रात्री संपुष्टात आलं. तो चायनीज ताईपेईच्या जे लिआओकडून १९-२०, १३-२१ असा पराभूत झाला. त्यामुळे तो उप उपांत्य पूर्व फेरीत पोहोचू शकला नाही. पॅरीस ऑलिम्पिक्सला जेमतेम महिना राहिल्यामुळे पी व्ही सिंधू, एच एस प्रणॉय, लक्ष्य सेन, सात्विकसाईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी, अश्विनी पोनप्पा, तनिशा क्रॅस्टो हे भारताचे आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत उतरलेले नाहीत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.