डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत ॲलेक्सेई पॉपिरिन कडून नोव्हाक जोकोविचचा पराभव

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेता नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्सेई पॉपिरिन यानं पराभवाचा धक्का दिला. पॉपिरिननं जोकोविचवर ६-४, ६-४, २-६, ६-४ अशी मात केली. एका वर्षात एकही ग्रँडस्लॅम जिंकण्यात अपयशी ठरण्याची जोकोविचची २०१७नंतरची ही पहिलीच वेळ आहे. 

दरम्यान, भारताचा युकी भांब्री आणि त्याचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ऑलिवेट्टी यांनी पुरुष दुहेरीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी, रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एब्देन या जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. एन. श्रीराम बालाजी आणि त्याच्या अर्जेंटिनाच्या जोडीदाराला पराभवाला सामोरं जावं लागलं.