अमरनाथ यात्रेला जम्मूहून प्रारंभ

सुप्रसिद्ध अमरनाथ यात्रेला आजपासून आरंभ झाला. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला जम्मूहून रवाना केलं. पहलगामहून उद्या यात्रा सुरु होईल. प्रशासनानं यात्रेकरूंसाठी ऑनलाईन नोंदणीसोबतच ऑफलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र आणि वैध ओळखपत्र सोबत असलेल्या यात्रेकरूंना २५० रुपये शुल्क भरून नोंदणी करता येईल.