अभिनेता अक्षय कुमारला हंगामी व्यक्तिमत्व संरक्षण प्रदान

मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता अक्षय कुमार याला तात्काळ प्रभावाने हंगामी व्यक्तिमत्व संरक्षण प्रदान केलं आहे. याद्वारे न्यायालयाने समाज माध्यम मंच, ई-कॉमर्स संकेतस्थळं आणि ए आय निर्मित चित्रफीत निर्मात्यांना त्याचं नाव, प्रतिमा, साम्यस्थळं आणि आवाज वापरण्यावर प्रतिबंध घातले आहेत. डिजिटल मंचाच्या माध्यमातून आपली प्रतिमा अवैधरित्या मलिन करण्याविरोधात अक्षय कुमार यानं वाणिज्यिक आय पी याचिका दाखल केली होती. याची दखल घेत ए आय चा वापर करून बनवलेल्या आभासी प्रतिमा आणि व्हिडिओ यांचं वास्तववादी स्वरूप अत्यंत चिंताजनक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर यांनी नोंदवलं आहे. यामुळे केवळ अक्षय कुमार यांचं केवळ व्यक्तिमत्व आणि नैतिक अधिकारांचं उल्लंघन होत नसून सार्वजनिक सुव्यवस्था आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका पोहोचत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.