डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अभिजित गंगोपाध्याय यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा आक्षेप

लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेदरम्यान काल भाजपा सदस्य अभिजित गंगोपाध्याय यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं आज आक्षेप नोंदवला. सकाळी सदनाचं कामकाज सुरु झाल्यावर काँग्रेस आणि टीएमसीच्या सदस्यांनी गंगोपाध्याय यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करत हा मुद्दा उपस्थित केला. गंगोपाध्याय यांचं वक्तव्य अयोग्य असून ते सभागृहाच्या प्रतिष्ठे विरोधात असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले. गंगोपाध्याय यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल इशारा देण्यात आल्याचं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.