३८ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा एक डिसेंबर ला होणार

पुण्याच्या क्रीडा विश्वात मानाची समजली जाणारी ३८ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा एक डिसेंबर रोजी होणार असून या स्पर्धेच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. स्पर्धा प्रवेशाची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर आहे. www.Marathon Pune.com या संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज भरता येईल. ही स्पर्धा पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, दहा किलोमीटर, पाच किलोमीटर, तीन किलोमीटर आणि दिव्यांग दौड अशा विविध गटात होणार आहे.