August 6, 2024 7:12 PM | Bangladesh

printer

बांगलादेशातल्या आंदोलकांकडून मोहम्मद युनूस यांची हंगामी सरकारच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्ती

बांगलादेशातल्या आंदोलकांनी हंगामी सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आंदोलकांनी नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर मोहम्मद युनूस यांची हंगामी सरकारच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्ती केल्याची माहिती आंदोलन समितीचे समन्वयक नाहिद इस्लाम यांनी समाज माध्यमावर शेअर केलेल्या व्हिडिओमधून दिली. प्रधानमंत्री शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती  मोहम्मद शहाबुद्दीन यांनी हंगामी सरकार स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला.