प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणं आणि सरकारी स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी बिहार विधानसभेत विधेयक मंजूर

बिहार राज्य विधानसभेनं प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणं, परीक्षांमधील गैरप्रकार आणि सरकारी स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी काल एक कठोर विधेयक मंजूर केलं. बिहार सार्वजनिक परीक्षा – गैरमार्ग प्रतिबंध विधेयक 2024 नुसार आता गंभीर प्रकरणांमध्ये 3 वर्षांवरून 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री विजय कुमार चौधरी यांनी हे विधेयक सादर केलं.