डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 7, 2025 3:32 PM | narendrmodi

printer

प्रधानमंत्र्यांची फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्याशी दूरध्वनीवरून आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. युक्रेनमधे सुरू असलेल्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची भारताची भूमिका असल्याचं मोदी यांनी या चर्चेत सांगितलं. भारत आणि फ्रान्समधल्या द्विपक्षीय संबंधांचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला.  जगात शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्यासाठी भारत – फ्रान्स भागीदारी महत्त्वाची भूमिका पार पाडत राहील असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. पुढल्या वर्षी फेब्रुवारीमधे भारतात आयोजित एआय इम्पॅक्ट समिटचं आमंत्रण मॅक्राँ यांनी स्वीकारल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे आभार मानले तसंच भारत मॅक्राँ यांच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं. 

प्रधानमंत्री मोदी यांनी नुकतीच युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँतोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेयन यांच्याशी संवाद साधला. स्थैर्यासाठी भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातली धोरणात्मक भागीदारी महत्त्वाची असल्याबाबत यावेळी सहमती झाली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.