परभणी जिल्ह्यात ६ लाखाच्यावर शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी भरले अर्ज

परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा ६ लाख २८ हजार ३५८ शेतकऱ्यांनी ४ लाख १७ हजार ५०६ हेक्टरसाठी अर्ज भरले आहेत. या योजनेअंतर्गत केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना विमा कवच दिलं जातं. हे अर्ज भरण्यासाठी उद्यापर्यंत मुदत असल्यानं जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज भरले नाहीत त्यांनी अर्ज करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.